मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मैन; म्हणाली, तो माझा..
![Manu Bhaker says there is nothing like that between me and Neeraj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Manu-Bhaker-780x470.jpg)
Manu Bhaker | पॅरिस ऑलिम्पिक्सच्या समारोपानंतर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि नेमबाज मनू भाकेर एकत्र दिसले. यावेळी मनू भाकेर आणि तिची आई नीरज चोप्रा एकमेकांशी बोलताना दिसले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला. व्हायरल व्हिडीओनंतर मनू आणि नीरज चोप्रा लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, नेमबाज मनू भाकेरने या चर्चेबाबत भाष्य केलं आहे.
नेमबाज मनू भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकच्या यशाबद्दल न्यूज १८ इंडियाशी सविस्तर संवाद साधला. यावेळी तिने लग्नाच्या चर्चेवरही प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, माझ्या आणि नीरजमध्ये असं काहीही नाहीय. ज्या प्रकारची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तो माझा वरिष्ठ खेळाडू आहे. तसेच, मी ब्रेकच्या वेळी व्हायोलिन वाजवण्याचा आनंद घेणार आहे. त्याचबरोबर कोणते तरी हॉर्स राइडिंगचे इन्स्टीट्युट जॉईन करेन, असं मनू भाकेर म्हणाली.
हेही वाचा – CIBIL स्कोरच्या संदर्भात RBI ने नियमात केला मोठा बदल, कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘हा’ नियम
भारतासाठी पदकं जिंकल्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे. आपले अॅथलिट्स यापुढेही चांगली कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. अनेक पदकं भारताला मिळाली पाहिजेत, असंही मनू भाकेर म्हणाली. मनूने पॅरीस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं तिने जिंकली आहेत. एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारांमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे.