Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! एमएस धोनी दुखापतीमुळे पहिले २ आठवडे बाहेर

MS Dhoni | आयपीएल २०२६ स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर ३० मार्चला होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणार आहे. या सामन्याआधी चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे एमएस धोनी सुरूवातीचे २ आठवडे खेळू शकणार नाही.

आजपासून या स्पर्धेची सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी धोनीने कसून सराव केला. त्याचे सराव करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पण आता तो आयपीएल २०२६ स्पर्धेतील सुरूवातीचे २ आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला धोनीशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२६ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करून धोनीच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. हा चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठा धक्का आहे.

हेही वाचा      :              क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर; IPL 2026 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून धोनीच्या दुखापतीबाबत अपडेट देणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिलेल्या माहितीनुसार, धोनीच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे या दुखापतीतून सावरण्यासाठी तो रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिले दोन आठवडे स्पर्धेबाहेर राहण्याची शक्यता आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोनीचा फोटो शेअर करून “गेट वेल सून.. थाला..” असे लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यात धोनी मैदानावर सराव करत असताना लंगडताना दिसला होता. आता धोनी दुखापतग्रस्त असल्याची माहिती चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून देण्यात आली आहे. धोनी २ आठवडे संघाबाहेर असेल. त्याच्या जागी संजू सॅमसन यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button