TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

चला सुरू झालं यांचं! केएल राहुल आणि अथिया शेट्टी अ‍ॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत

टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल आणि त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी हे दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले आहेत. बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सध्या केएल राहुलसोबत ऑस्ट्रेलियात आहे. T20 विश्वचषक 2022 मधील टीम इंडियाच्या सामन्यांमध्ये अथिया शेट्टी अनेकदा केएल राहुलला सपोर्ट करताना दिसली आहे.

अथिया शेट्टी केएल राहुलसोबत शॉपिंग करताना दिसली

केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय टीमचा ओपनिंग बॅट्समन केएल राहुल पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीसोबत लग्न करण्याची शक्यता आहे. तसेच  हे दोघेजण महाराष्ट्रामध्येच लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे

अथिया शेट्टीचा केएल राहुलला जोरदार पाठिंबा

टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या परस्पर संमतीने हे कपल पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये लग्नबंधनात अडकू शकते. T20 विश्वचषक 2022 मध्ये अथिया शेट्टी केएल राहुलला जोरदार पाठिंबा देत आहे. T20 विश्वचषक 2022 मध्ये केएल राहुल तो फॉर्मात आला असून आपल्या फलंदाजीने टीम इंडियाला विजय मिळवून देत आहे.

केएल राहुलसाठी अथिया शेट्टी लकी चार्म 

 टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये केएल राहुलची फलंदाजी अत्यंत निराशाजनक होती. पण राहुलने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावले आणि अथिया शेट्टी मॅच पाहण्यासाठी अॅडलेडला पोहोचली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button