breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

ऋतुराज गायकवाडला भारतीय संघातून वगळल्याने माजी दिग्गज संतापला; म्हणाला..

Ruturaj Gaikwad | भारतीय संघ लवकरच श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रवाना होणार आहे. गुरुवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली नाही. यावरून माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी भारतीय संघ निवडसमितीवर ताशेरे ओढले आहेत.

निवडसमितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले, ऋतुराज गायकवाडची कामगिरी पाहता टी-२० संघात त्याची निवड होणं स्वाभाविक होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे आता ऋतुराजने अधिक धावा केल्या पाहिजेत, ज्यामुळे निवडसमितीला त्याच्या नावाचा विचार करावाच लागेल. कारण प्रत्येकाचे नशीब शुबमन गिलसारखे नसते.

हेही वाचा    –      शिवसेना भोसरी विधानसभेचे पदाधिकारी जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी! 

दरम्यान, ऋतुराज गायकवाडने झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याने चार सामन्यांच्या तीन डावात १५८.३३ च्या स्ट्राइक रेटने एकूण १३३ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या ७७* धावा होती. त्याच वेळी, गिलने पाच सामन्यांच्या पाच डावांमध्ये १२५.९२ च्या स्ट्राइक रेटने १७० धावा केल्या.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ :

भारताचा टी-२० संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button