breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

कोलकाताची फायनलमध्ये दमदार एन्ट्री! हैदराबादचा 8 गडी राखून पराभव

KKR vs SRH | कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ च्या अंतिम फेरीत पोहचली आहे. केकेआरने हैदराबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या १६० धावांचं आव्हान हे २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूला पराभवानंतरही हैदराबादला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेड पहिल्याच षटकात शून्य धावांवर बाद झाल्याने सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली. अभिषेक शर्माही दुसऱ्या षटकात ३ धावा काढून बाद झाला. राहुल त्रिपाठी आणि हेनरिक क्लासेन यांच्यात ६२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आणि दोघांनीही धावगती सुधारली. दरम्यान, क्लासेन ११व्या षटकात ३२ धावा काढून बाद झाला. १४व्या षटकात त्रिपाठी ५५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाची अवस्था इतकी बिकट होती की १५ षटकांत हैदराबादची धावसंख्या ८ विकेट्सवर १२५ धावा होती. यानंतर कर्णधार पॅट कमिन्स कसा तरी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पॅट कमिन्स आणि विजयकांत यांच्यात शेवटच्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी झाली होती, मात्र २० व्या षटकात कमिन्स ३० धावांवर बाद झाला. यासह सनरायझर्स हैदराबादचा डाव १५९ धावांवर गारद झाला.

हेही वाचा     –      ‘प्रत्येक टप्प्यावर इंडिया आघाडी सत्तेच्या दिशेने’; अरविंद केजरीवाल यांचा दावा

हैदराबादने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरेन आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी केकेआरला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, चौथ्या षटकात गुरबाज १४ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. या दमदार सुरुवातीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पॉवरप्ले षटकांत १ गडी गमावून ६३ धावा केल्या होत्या. पॉवरप्ले संपल्यानंतरही केकेआरचा रनरेट कमी झाला नाही. १० षटकांच्या अखेरीस कोलकाताने २ गडी गमावून १०७ धावा केल्या होत्या आणि संघाला विजयासाठी ६० चेंडूत ५३ धावा करायच्या होत्या. दरम्यान, व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर कर्णधार श्रेयस अय्यरने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस यांच्यातील ९७ धावांच्या नाबाद भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून विजय निश्चित झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button