breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
IPL2020: रॉयल चैलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना रंगणार
क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२०ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच रविवारी या लीगमधील १९ वा सामना खेळला गेला. काल चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगला. या सामन्यात चेन्नईने पंजाबवर मात केली. त्यानंतर आज रॉयल चैलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल (RCB vs DC) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण कोणावर वरचढ ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. हा सामना दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.