breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020: राजस्थानचा मुंबईवर 8 गडी राखून विजय

दुबई – आयपीएल २०२०मध्ये काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान राजस्थानने 18.2 षटकांत 2 विकेट्स गमावून पूर्ण केले. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला सुरुवातीला दोन धक्के बसले होते. मात्र त्यानंतर स्टोक्स आणि संजू यांनी मुंबईच्या गोलंदाजीवर कडक प्रहार करत चौफेर फटकेबाजी केली. स्टोक्सने यावेळी धडाकेबाज शतक झळकावले, तर संजूने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

सामन्याच्या सुरुवातीला मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. मुंबईला 7 धावांवर पहिला धक्का क्विंटन डी कॉकच्या रुपात बसला. क्विंटन 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने चांगली खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. ही जोडी कार्तिक त्यागीने फोडली. कार्तिकने इशान किशनला 37 धावांवर बाद केले. किशनने 36 चेंडूत 37 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. इशाननंतर सूर्यकुमार यादव 40 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 26 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. कर्णधार कायरन पोलार्डला मात्र या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही. पोलार्ड 6 धावा करुन माघारी परतला.

झटपट विकेट्स गमावल्यानंतर मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि सौरभ तिवारीने काही षटकांत फटकेबाजी केली. परंतु सौरभ तिवारी फटकेबाजीच्या नादात 34 धावांवर बाद झाला. त्याने 24 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. सौरभनंतर कृणाल पांड्या मैदानात आला. कृणालच्या सोबतीने हार्दिकने तुफान फटकेबाजी केली. हार्दिकने 21 चेंडूत नाबाद 60 धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये त्याने 7 षटकार आणि 2 चौकार लगावले. तर राजस्थानकडून जोफ्रा आर्चर आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी 2 व कार्तिक त्यागीने 1 विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सने दिलेल्या विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची सुरुवात निराशाजनक राहिली. रॉबिन उथप्पाच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. उथप्पा 13 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ मैदानात आला. स्टीव्हने काही वेळ मैदानात घालवला. मात्र त्यालाही जेम्स पॅटिन्सनने 11 धावांवर बाद केले. त्यामुळे राजस्थानची 4.4 षटकांत 44-2 अशी परिस्थिती झाली.

त्यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅमसनच्या सोबतीने सलामीवीर बेन स्टोक्सने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 152 धावांची नाबाद भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान संजू सॅमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच स्टोक्सनेही षटकार मारत शतक पूर्ण केले. स्टोक्सने 59 चेंडूत दमदार शतक पूर्ण केले. त्याने एकूण 60 चेंडूत नाबाद 107 धावांची खेळी केली. यामध्ये 3 षटकार आणि 14 चौकारांचा समावेश होता. तर संजू सॅमसनही 54 धावांवर नाबाद राहिला. त्याने या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकार फटकावले. तर मुंबईकडून जेम्स पॅटिन्सनने 2 विकेट्स घेतल्या. पॅटिन्सनचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button