IPL 2021 : लेकरांसह स्टेडियममध्ये नो एन्ट्री!
![IPL 2021: No entry in the stadium with Lakers!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/ipl.jpg)
- दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत प्रेक्षकांना एन्ट्री मिळाली असली तरी….
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीनं आयपीएलच्या १४ व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होत आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामातील युएईत पार पडलेली संपूर्ण स्पर्धा आणि त्यानंतर भारतात रंगलेल्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धा प्रेक्षकांशिवाय रंगल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावेळी चाहत्यांना स्टेडियमवर जाऊन मॅच पाहता येणार आहे. युएईतील दुबई, शारजा आणि अबूधाबीच्या स्टेडियमवर जाऊन प्रेक्षकांना सामना पाहता येणार आहे.
स्पर्धेवेळी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एन्ट्री मिळाली असली तरी संख्येवर मर्यादा आहे. याशिवाय काही अटीही घालण्यात आल्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे 16 वर्षांखालील क्रिकेट चाहत्याला सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात येणार नाही. याचा अर्थ लहान मुलांना स्टेडियममध्ये घेऊन जाण्यावर बंधन असणार आहे. कोरोना काळात ज्या क्रिकेट सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी मिळाली त्यात बऱ्याचवेळा प्रेक्षकांना तिकिटासोबतच कोरोना चाचणी बंधनकारक होती. मात्र दुबईमध्ये हे निर्बंध नाहीत. एएनआयच्या वृत्तानुसार प्रेक्षकांना विना PCR कोविड 19 चाचणीशिवाय स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यानंतरचा गुणतक्ता
१. दिल्ली – ८ सामन्यांत १२ गुण
२. चेन्नई – ७ सामन्यांत १० गुण
३. बंगळुरू – ७ सामन्यात १० गुण
४. मुंबई – ७ सामन्यात ८ गुण
——————————————
५. राजस्थान – ७ सामन्यात ६ गुण
६. पंजाब – ८ सामन्यात ६ गुण
७. कोलकाता – ७ सामन्यात ४ गुण
८. हैदराबाद – ७ सामन्यात २ गुण