breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : हैदराबादसमोर आज कोलकाताचे आव्हान

अबूधाबी – आयपीएलच्या आज दुपारी होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने भिडणार आहेत. सलग तिसरा पराभव टाळण्याच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरतील.

इयोन मॉर्गनने नेतृत्त्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्याच लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. आंद्रे रसेलची सुमार कामगिरी कोलकाताला महागात पडत असून अन्य फलंदाजही खेळ उंचावण्यात अयशस्वी ठरत आहेत. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करणाऱ्या हैदराबादची सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यावर सर्वाधिक भिस्त आहे. त्यामुळे आज कोणते खेळाडू किती फटकेबाजी करणार आणि कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे रंजक असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button