breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : चुरशीच्या सामन्यात मुंबईनं दिल्लीवर मारली बाजी

दुबई – आयपीएलच्या १३व्या हंगामात आतापर्यंत चॅम्पियन कामगिरी करणारे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन बलाढ्य संघात काल सामना रंगला. दोन्ही चॅम्पियन्स आमनेसामने आल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी सुपर संडे चांगलाच एन्जॉय केला. या सामन्यात क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकांमधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीवर ५ गडी आणि २ चेंडू राखून मात केली. दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद ६९ धावांची खेळी केली होती. मात्र ती व्यर्थ ठरली. दरम्यान, या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान परत पटकावले आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दिल्लीला हवी तशी सुरुवात करता आली नाही. पृथ्वी शॉ ३ चेंडूत ४ धावा करुन बोल्टचा शिकार ठरला. त्यानंतर अंजिक्य रहाणेला पहिल्यांदाच या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रिषभ पंत फॉर्मात नसल्यामुळे त्याला आराम देऊन रहाणेला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला मोठी खेळी साधता आली नाही. केवळ १५ धावा करुन रहाणे बाद झाला. त्यानंतर शिखर धवनने डाव सावरला आणि ५२ चेंडूत ६९ धावा ठोकल्या. शिखरलादेखील आज पहिल्यांदाच चालू हंगामातला आपला फॉर्म गवसला. तर श्रेयस अय्यरने ४२ धावा आणि पहिल्यांदा खेळणारा एलेक्स करीने १४ धावा ठोकल्या. त्यामुळे दिल्लीने मुंबईसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना क्विटंन डि कॉक आणि सुर्यकुमार यादव दोघांनीही ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या इशान किशननेदेखील १५ चेंडूत २८ धावा ठोकल्या. त्यामुळे मुंबईचा विजय आणखी समीप आला होता. शेवटच्या तीन षटकात कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्या यांनी संयमी आणि उत्कृष्ट खेळी करत शेवटच्या षटकातील दोन चेंडू बाकी ठेवत हा सामना खिशात घातला.

दरम्यान, काल अजिंक्य रहाणे आपल्या पहिल्याच सामन्यात १५ धावा करुन बाद झाला असला तरी त्याने स्वतःच्या नावावर एक विक्रम नोंदविला आहे. टी-२० सामन्यात रहाणेने ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. पाच हजार धावा पूर्ण करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर शिखर धवनने काल आपले ३८ वे अर्धशतक पूर्ण केले. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैनाच्या नावावर ३८ अर्धशतकांचा विक्रम होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button