breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स ची किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार लढत

दुबई – यंदाच्या आयपीएलमध्ये सलग पाच सामने जिंकणाऱ्या बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाची आज किंग्स इलेव्हन पंजाबशी लढत होणार आहे. त्यामुळे आज क्रिकेटप्रेमींसाठी सुपर संडे ठरणार हे नक्की. दोन्ही संघांमध्ये मुंबईचे पारडे जड वाटत असले तरी ख्रिस गेलच्या आगमनामुळे पंजाब संघात नवा उत्साह संचारला आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार असे दिसतेय. सायंकाळी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने मागील लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. मात्र रोहितचे सातत्य डळमळीत असल्याने सलग दोन लढतींमध्ये सामनावीर ठरलेला क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे. तर दुसरीकडे ख्रिस गेलच्या पुनरागमनीय सामन्यात पंजाबने बेंगळूरुवर जोरदार विजय मिळवला. गेलव्यतिरिक्त के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल यांच्याकडून त्यांना सर्वाधिक अपेक्षा आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबई इंडियन्स एका विजयामुळे प्ले-ऑफच्या समीप जाणार आहे तर आणखी एक पराभव पंजाब संघाला या शर्यतीतून बाहेर होण्यास पुरेसा ठरू शकतो. त्यामुळे सलग पाच सामने जिंकणाऱ्या मुंबईचा विजयरथ रोखण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button