breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : आजची लढत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

अबुधाबी – आयपीएलच्या १३व्या हंगामात सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स हा अतिशय चुरशीचा सामना रंगल्यानंतर आज सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांविरोधात भिडणार आहेत. दिल्लीने आतापर्यंत सर्व सामन्यात विजय मिळवला आहे तर हैदराबादने सर्व सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्यामुळे आज हैदराबाद विजयाचं खातं उघडणार की पुन्हा पराभवाचा सामना करणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. शेख जायद स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर करत आहे. तर सनराइजर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज डेव्हिड वार्नर संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार आज 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे.

दिल्ली आणि हैदराबादने आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. या हंगामात चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर दोन्ही सामन्यात विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दिल्लीने पहिल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब, तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला पराभूत केले आहे. दुसरीकडे सनराइजर्स हैदराबादचा गेल्या दोन्ही सामन्यात पराभव झाल्याने हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषब पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, आंद्रे र्त्जे, आवेश खान

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकिपर), मनीष पांडे, विजय शंकर, मोहम्मद नबी, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button