breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsENG चौथ्या कसोटीत इंग्लडची खराब सुरुवात

अहमदाबाद – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी कोणाची निवड होणार याचा निर्णय या 4 दिवसांत होणार आहे. याचे कारण असे की, भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणाऱ्या या डे-नाईट कसोटीच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्यांची सुरुवात मात्र खराब झाली आहे.

पहिल्याच सत्रात इंग्लंडचे तीन फलंदाज बाद झाले आहेत. पहिल्यांदा फिरकीपटू अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर डॉमिनिक सिब्ले याला अक्षरने त्रिफळाचीत केले. त्याने फक्त दोन धावा काढल्या, सिब्लेच्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर जॅक क्रॉले यालाही अक्षरने मोहम्मद सिराजच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. क्रॉलीने 9 धावा केल्या. त्यानंतर मैदानात जॉनी बेयरस्टो आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांची जोडी खेळत होती पण मोहम्मद सिराजने कर्णधार जो रुटला पाच धावांवर पायचीत करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. सध्या ५६ धावांवर इंग्लंडचे तीन खेळाडू माघारी परतले आहेत.

दरम्यान, भारताने या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. तर इंग्लंडचा संघ तीन गोलंदाजांसह मैदानात उतरला असून जोफ्रा आर्चर आणि स्टुर्अट ब्रॉडला संघात जागा मिळालेली नाही. फलंदाजी भक्कम करण्यासाठी इंग्लंडने डॅनियल लॉरेन्सला संघात स्थान दिले आहे, तर स्पिनर डोमिनिक बेस यालाही अखेरच्या कसोटीत संधी मिळाली आहे.

भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार) , अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर) , आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा.

इंग्लडचा संघ
जो रूट (कर्णधार), डॉमिनिक सिब्ले, जॅक क्रॉले, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, डी लॉरेन्स, बेन फोक्स, डॉमनिक बेस, जॅक लीच, आणि जेम्स अँडरसन.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button