Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ दोन खोळाडूंचे संघात पुनरागमन
![India’s squad for AsiaCup2023 announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Asia-Cup-2023-1-780x470.jpg)
Asia Cup 2023 : येत्या ३० ऑगस्टपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. दरम्यान, यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप २०२३ साठी आपला संघ जाहीर केला आहे. १७ सदस्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर परतले आहेत. तर युझवेंद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. चहलला संघात स्थान न मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
हेही वाचा – शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? कारणही आलं समोर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २ सप्टेंबरला आशिया चषकात पहिला सामना खेळणार आहे. हा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. यानंतर भारताचा दुसरा गट सामना ४ सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच गट-अ मध्ये आहेत. आशिया कप पाकिस्तानच्या यजमानपदाखाली हायब्रिड मॉडेलच्या आधारे खेळवला जाणार आहे.
Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Tilak Varma, KL Rahul, Ishan Kishan, Hardik Pandya (VC), Ravindra Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Prasidh Krishna
Traveling stand-by…
— BCCI (@BCCI) August 21, 2023
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा.