breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताला मिळालं दुसरं गोल्ड मेडल

Asian Games 2023 : महिला भारतीय संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा १९ धावांनी पराभव करत सुवर्ण पदक पटकवलं आहे. एशियन गेम्समध्ये भारताने दिवसातील हे दुसरं सुवर्ण पदक पटकावलं आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ११६ धावांचे आव्हान उभारले होते. भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी शानादार फलंदाजी केली. स्मृती मंधानाने ४५ चेंडूंत ४६ धावांची तर जेमिमाने ४० चेंडूत ४२ धावा केल्या.

हेही वाचा – शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा 

प्रत्युत्तरात श्रीलंका संघ २० षटकांत ८ गडी गमावत ९७ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारतीय संघाची गोलंदाज तितास साधू हिने तीन बळी घेतले. तर राजेश्वरी गायकवाडने दोन बळी घेतले. त्याशिवाय दिप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैदय यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button