भारतीय संघाची निवड करताना गंभीरचा मोठा प्लॅन
धोनीच्या लाडक्या खेळाडूंचा संघ निवडताना केला पत्ता कट
![India, team, selection, gambhir, plan, Dhoni, players, addresses, cuts,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/dhoni-780x470.jpg)
नवी दिल्ली : गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात असलेलं नात जगजाहीर आहे. गंभीर कधीच धोनीबद्दल चांगलं बोललेला नाही. आता गंभीर यांनी भारताचे प्रशिक्षकपद मिळवल्यावर महेंद्रसिंग धोनीचा बदला घ्यायला सुरुवात केली आहे, असे चाहते म्हणत आहेत. कारण गंभीरने यावेळी संघ निवडताना धोनीच्या लाडक्या खेळाडूंचा पत्ता कट केला आहे.
गंभीर आणि धोनी यांच्यात विस्तवही जात नाही, असे म्हटले जाते. कारण २००७ आणि २०११ च्या वर्ल्ड कप फायनल्स पाहिल्या तर त्यामध्ये गंभीरने धोनीपेक्षा उजवी कामगिरी केली होती. पण तरीही प्रसिद्धी धोनीला मिळाली. धोनीने आपले श्रेय लाटल्याचे गंभीरला नेहमीच वाटत आहे आणि चाहत्यांनी ही गोष्ट किती खरी आहे, याचीही उदाहरणं दिली आहेत. पण आता गंभीर हे भारताचे प्रशिक्षक झाले आहेत. त्यामुळे आता त्यांनी धोनीच्या लाडक्या खेळाडूंना संघाबाहेर काढण्याचा प्लॅन आखला आहे, असे चाहते म्हणत आहेत.
गंभीर प्रशिक्षक झाल्यावर प्रथमच भारतीय संघाची निवड करण्यासाठी उपस्थित होते. बीसीसीयच्या बैठकीत गंभीर यांनी आपली स्पष्टपणे मतं मांडली आणि त्यांनी आपल्या म्हणण्यानुसार संघ निवडल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये गंभीर यांनी पहिला पत्ता कट केला तो हार्दिक पंड्याचा. हार्दिक हा भारताचा टी २० संघाचा कर्णधार होणार होता. पण गंभीर यांनी असा काही नियम बनवला की, त्यामध्ये हार्दिक अडकल्याचे पाहायला मिळाले.
हार्दिकनंतर गंभीर यांनी जडेजाचा पत्ता कट करण्याची योजना आखल्याचे म्हटले जात आहे. जडेजा आता संघात असला तरी तो पुढील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा भाग नसेल, असे गंभीर यांनी स्पष्टपणे निवड समितीला सांगितले आहे. त्यामुळे हार्दिकनंतर जडेजाही वनडे संघाबाहेर जाणार आहे आणि तो फक्त कसोटी क्रिकेट खेळू शकतो. जडेजा हा धोनीचा सर्वात खास खेळाडू समजला जातो. पण त्यालाही आता संघाबाहेर केले जाणार असल्याचे समोर येत आहे.
धोनीचा उत्तराधिकारी कोण, याचे उत्तर चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडच्या रुपात दिले होते. धोनीचा सर्वात विश्वासू खेळाडू म्हणून ऋतुराजकडे पाहिले जाते. त्यामुळे ऋतुराजला या दौऱ्यातील एकाही संघात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे गंभीरने धोनीच्या लाडक्या खेळाडूंना संघाबाहेर करण्याची रणनिती आखली आहे, असे चाहते म्हणत आहेत.
गंभीरने प्रशिक्षक झाल्यावर आता काही महत्वाच्या गोष्टी संघात केल्या आहेत. ज्यामुळे संघातील खेळाडूंना चांगली शिस्त लागू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळं गंभीर यांच्या कार्यकाळात नेमकी भारतीय संघाची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.