भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार? ‘या’ दिवशी होणार सामना?
![India-Pakistan match date will change? The match will be held on 'this' day?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/ind-vs-pak-world-cup-2023-780x470.jpg)
IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात होणार आहे. यासाठीचे वेळापत्रकही ICC ने काही दिवसांपुर्वी जाहीर केलं आहे. वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. पण आता या सामन्याच्या तारखेत बदल होऊ शकतो. एका माध्यामांने दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सामना आता १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबरला होऊ शकतो.
वास्तविक नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून होत आहे आणि अहमदाबादमध्ये ती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या उत्सवादरम्यान सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. आता भारत-पाकिस्तान सामनाही १५ ऑक्टोबरला होणार असेल, तर दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवणे सुरक्षा यंत्रणांना सोपे जाणार नाही. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला भारत-पाकिस्तान सामन्याचे वेळापत्रक बदलण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा १४ वा हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला येणार..
#ICCWorldCup2023: The blockbuster #INDvsPAK could be advanced by a day to October 14 due to the opening day of #Navratri celebrations in Ahmedabad, a development which may lead to logistical nightmare for the fans.https://t.co/81qadYpejB pic.twitter.com/fYw4mllDCN
— Khaleej Times (@khaleejtimes) July 27, 2023
आता भारत-पाकिस्तान सामना आता एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पण असे झाल्यास हजारो चाहत्यांना धक्का बसू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक स्टेडियममध्ये पोहोचतील.