breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयक्रिडादेश-विदेश

सलग नववा विजय मिळवत भारताने रचला इतिहास! नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव

दिवाळीच्या दिवशीच क्रिकेट रसिकांना ‘टीम भारत’ची भेट

नवी दिल्ली: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने गट फेरीतील आपले सर्व सामने जिंकले. त्यांनी सर्व नऊ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव इतिहास रचला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने ५० षटकांत चार विकेट गमावत ४१० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ ४७.४ षटकांत सर्वबाद २५० धावांवर आटोपला. टीम इंडियाने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांना विजयाची भेट दिली.

टीम इंडियाचा सामना आता पहिल्या उपांत्य फेरीत १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्यांनी सर्व नऊ संघांचा पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा पराभव केला. गुणतालिकेत टीम इंडियाचे १८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे, नेदरलँड्सने विश्वचषकातील आपला प्रवास तळाच्या १०व्या स्थानावर संपवला. नेदरलँड्सला नऊ सामन्यांत दोन विजय मिळवता आले आणि सात सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर नेदरलँड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button