IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला मोफत पाहता येणार, वाचा..
![IND vs AUS : India-Australia World Cup can be watched for free, read..](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/IND-vs-AUS-1-780x470.jpg)
IND vs AUS : आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील पहिले ४ सामने पार पडले आहेत. आता पाचवा आणि बहुप्रतिक्षित सामना हा आज होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचा वर्ल्ड कप २०२३ मधील हा पहिलाचं सामना असणार आहे. तर या सामन्याबद्दलची A टू Z माहिती जाणून घेऊयात…
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना केव्हा होणार?
आज (रविवार ८ ऑक्टोबर २०२३)
कुठं होणार ही चुरशीची लढत?
एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई
हेही वाचा – टोल दरवाढीवरून मनसेचा राज्य सरकारला इशारा; राज ठाकरे म्हणाले..
या सामन्याचं बिगुल किती वाजता वाजणार?
भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी २ वाजता सुरु होईल; तर १ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेक होईल.
हा सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर पाहता येईल.
हा सामना मोबाईलवर मोफत कुठं पाहता येईल?
डिज्नी प्लस हॉटस्टार या अँपवर पाहता येईल .