हार्दिक पंड्यामुळे संघातील वातावरण बिघडले
रोहितसह चार खेळाडू खेळणार अखेरचा सामना
![Hardik Pandya, team, atmosphere, Rohit, four players, last match,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/rohit-780x470.jpg)
मुंबई : वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा या हंगामातील अखेरचा सामना हा लखनौ सुपर जायंट्सबरोबर होणार आहे. पण रोहित शर्मासह हा मुंबई इंडियन्समधील चार खेळाडूंचा अखेरचा सामना असू शकतो.
हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सांभाळले आणि त्यानंतर संघातील वातावरण संपूर्ण बिघडले. कारण हार्दिकने नेतृत्व सांभाळल्यावर त्याने आपल्या पद्धतीने संघाची धुरा सांभाळायला घेतली. पण त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. एकिकडे हार्दिक कर्णधार म्हणून अपयशी ठरला, दुसरीकडे एक खेळाडू म्हणूनही त्याची कामगिरी वाईट झाली. त्याचबरोबर नेतृत्व करताना हार्दिकने काही खेळाडूंना दुखावले. या गोष्टीमुळे रोहित शर्मासह चार खेळाडू आता मुंबई इंडियन्सच्या संघात पुढच्या वर्षी दिसणार नसल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ लीक झाला होता. त्यामध्ये रोहित शर्माने आपण पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघात नसणार, असे सुतोवाच केले होते. त्यामुळे रोहित पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघात नसणार हे तेव्हा स्पष्ट झाले होते. पण रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या संघातून एकटा बाहेर पडणार नाही तर त्याच्याबरोबर अजून तीन खेळाडू त्याच्याबरोबर मुंबई इंडियन्सला अलविदा करणार असल्याचे म्हटले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माने हार्दिक पंड्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. यामध्ये रोहितबरोबर जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव असल्याचे समोर आले आहे. या तिघांनी उघडपणे हार्दिकबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी उघडपणे हार्दिकश वैर घेतले आहे. त्यामुळे रोहितबरोबर बुमराह आणि सूर्यकुमार हे दोघेही पुढच्या वर्षी मुंबईच्या संघातून बाहेर पडतील, असे म्हटले जात आहे. या तिघांबरोबर मुंबईच्या संघातून अजून एक खेळाडू बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे.
रोहित, सूर्या आणि बुमराह यांच्याबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघातून तिलक वर्माही बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिलक हा एक युवा धडाकेबाज फलंदाज आहे. पण तिलकला संधी दिली ती रोहित शर्माने. त्याचबरोबर रोहितने त्याच्यावर क्रिकेटचे संस्कार केले. तिलकने रोहितने दिलेल्या संधीचे सोने केले आणि तो दमदार फलंदाजी करत आहे. पण आता पुढच्या वर्षी हे चार खेळाडू मुंबईच्या संघात नसतील, असे म्हटले जात आहे.
आययपीएलमध्ये पुढच्या वर्षी मोठा लिलाव होणार आहे. या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघातून हे चार खेळाडू बाहेर पडतील. पण जर संघ मालकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर मात्र वेगळे चित्र पाहायला मिळू शकते. त्यावेळी कोणते खेळाडू संघ मालकांचे ऐकतात हे पाहणे उत्सुकचे असेल.