गुजरात टायटन्स संघातील खेळाडूची Love Jihad बद्दल पोस्ट, नंतर मागितली माफी
![Gujarat Titans player's post about Love Jihad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/yash-dayal-1-780x470.jpg)
Yash Dayal : दिल्लीमध्ये साहिल नावाच्या आरोपीने अल्पवयीन मुलीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. संपूर्ण देशात या हत्याकांडाची चर्चा आहे. दरम्यान, गुजरात टायटन्स संघाचा खेळाडूच्या एका पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टचा दिल्लीत झालेल्या साक्षी हत्याकांडाशी संबंध असल्याने तो चांगलाच ट्रोल होत आहे.
गुजरात टायटन्स संघाचा लेफ्टी बॉलर यश दयालने ही पोस्ट केली होती. यश दयाल या हत्याकांडांशी संबंधित पोस्ट शेयर करून फसला. तो ट्रोल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याने हात जोडून माफी सुद्धा मागितली आहे.
हेही वाचा – हवामानातील बदलांमुळे ऑक्सिजनचे महत्व लोकांना पटू लागले: दिनेश यादव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/yash-dayal-2-1024x576.jpg)
यश दयालने चुकून माझ्याकडून ही स्टोरी पोस्ट झाली होती. त्यासाठी त्याने माफी मागितली. द्वेष पसरवू नका. मी प्रत्येक समुदाय, सोसायटीचा आदर करतो, असं यशने दुसऱ्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.