breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी
फुटबॉल पंच कॅथरियनने रचला नवा इतिहास
ओरलँडो – फिलेडेलफियाची आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉल पंच 32 वर्षीय कॅथरिनने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या ‘ब’ गटातील झालेल्या बर्मुडा-कॅनडा यांच्यातील लढतीत प्रत्यक्ष मैदानात सहाय्यक पंचांची भूमिका बजावून नवा इतिहास रचला. नॉर्थ-सेंट्रल अमेरिका, कॅरेबियन विभागाच्या पात्रता फेरीच्या फुटबॉल सामन्यात मैदानात सहाय्यक पंचांची भूमिका पार पाडणारी ती पहिली महिला फुटबॉल पंच ठरली. या लढतीत कॅनडाने 5-1 असा सहज विजय मिळवला. 2015 पासून कॅथरिन फुटबॉल पंच म्हणून काम करत आहे. या अगोदर तिने मुलींच्या 17, 20 वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आणि महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत देखील पंच म्हणून काम पाहिले. तसेच अमेरिक फुटबॉल लिग स्पर्धेत ती गेली बरीच वर्षे पंच म्हणून काम करीत आहे.