भारत-अफगाणिस्तान यांच्यात आज पहिला टी-२० सामना; ‘या’ फलंदाजाची माघार
![First T20 match between India and Afghanistan today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/IND-vs-AFG-1-780x470.jpg)
IND vs AFG : अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यामध्ये आज पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे. ही सीरिज 3 सामन्यांची असून आज पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सिरीजसाठी अफगाणिस्तानची टीम भारताच्या दौऱ्यावर आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही सिरीज खेळवली जाणार असल्याने याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने मात्र वैयक्तिक कारणास्तव पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यातून माघार घेतली आहे. परंतु तो उर्वरित दोन सामन्यांसाठी उपलब्ध असेल असे भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
वेळ
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार
कुठे पाहता येणार लाईव्ह सामना?
स्पोर्ट्स १८ चॅनेल
हेही वाचा – रोहित पवार विरूद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद पेटणार; प्रकरण काय?
मोबाईलवर कुठे पाहता येणार लाईव्ह सामना?
जिओ सिनेमा ॲप
भारताची संभाव्य टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तानची संभाव्य टीम
इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलिखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.