क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

डोमराजून गुकेश वयाच्या 18 वर्षी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन

गुकेशची महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला चेक मेट

राष्ट्रीय : डोमराजून गुकेश हा वयाच्या 18 वर्षी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. तीन आठवडे चाललेल्या या बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये त्याने गत विजेता चॅम्मियन चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. याचबरोबर त्याने गॅरी कास्पारोव्हला मागे टाकत जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनण्याचा मान पटकवला आहे. भारताच्या या ग्रँडमास्टरने 14व्या डावात डिंग लिरेनचा पराभव करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा आपल्या खिशात घातली आहे.

गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट दिला आहे. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचं गुकेश याचं स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी त्यानं माइंड गुरु पॅडी अप्टन यांचं मार्गदर्शन घेतलं. यापूर्वी पॅडी अप्टन यांनी 2011 च्या क्रिकेट विश्वचषक विजेता भारतीय संघ, आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाला देखील मार्गदर्शन केलं आहे.पॅडी अप्टन गेल्या चार महिन्यांपासून गुकेशसोबत असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार संदीप सिंघल यांनी गुकेश आणि पॅडी अप्टन यांची भेट घडवून आणली होती. संदीप सिंघल हे पाचवेळा बुद्धिबळात विश्व चॅम्पियन राहिलेल्या विश्वनाथ आनंद यांच्यासोबत वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीचे सह संस्थापक आहेत.खेळावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करण्यासाठी गुकेशला पॅडी अप्टन यांची खूप मदत झाली. पॅडी अप्टन यांच्यामुळे गुकेशला मन स्थिर ठेवण्यासाठी मोलाची मदत झाली.

कोण आहे डोमराजून गुकेश?

सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला डी गुकेश हा मुळचा चेन्नईमधील आहे. डी गुकेशची आई पेशानं मायक्रोबायोलॉजिस्ट तर वडील डॉक्टर आहेत. मात्र गुकेशला बुद्धिबळाची आवड होती. डी गुकेशने वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. बुद्धिबळ खेळायला सुरुवात केल्यानंतर गुकेश 11 वर्षांनी वर्षांनी जगतजेत्ता बनला आहे. त्याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेवर आपलं नाव कोरलं आहे. जो जगतजेत्ता बनला आहे. या सर्व प्रवासात माइंड गुरु पॅडी अप्टन त्याच्यासोबत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button