दिल्ली कॅपिटल्ससाठी धक्कादाक बातमी, ऋषभ पंतवर IPL मध्ये कारवाई
स्लो ओव्हर रेट बद्दल दिल्ली कॅपिटल्सवर कारवाई
![Delhi, Capitals, Shock, News, Rishabh Pant, IPL, Action, Slow over rate,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/WhatsApp-Image-2024-05-11-at-6.39.54-PM-780x470.jpeg)
नवी दिल्लीः IPL 2024 च्या सीजनमध्ये कालचा दिवस दिल्ली कॅपिटल्ससाठी खूपच वाईट ठरला. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमने दिल्ली कॅपिटल्सवर 106 धावांनी मोठा विजय मिळवला. दिल्लीची टीम हरलीच, पण पराभवाच अंतर खूप असल्याने रनरेटमध्ये मोठा फटका बसला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 272 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात दिल्लीची टीम 166 रन्सवर ऑलआऊट झाली. KKR च्या सुनील नरेनने दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच दणका दिला. त्याने 39 चेंडूत 85 धावा फटकावल्या. यात 7 फोर, 7 सिक्स होत्या. ऋषभ पंतने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. ऋषभने 25 चेंडूत 55 धावा फटकावल्या. यात 4 फोर, 5 सिक्स होते.
या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला आर्थिक आघाडीवर आणखी एक मोठा धक्का बसला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध स्लो ओव्हर रेट बद्दल दिल्ली कॅपिटल्सवर कारवाई करण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतवर आयपीएलच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली. चालू सीजनमध्ये दिल्लीने षटकांची गती धीमी राखण्याची ही दुसरी वेळ होती. ऋषभ पंतवर 24 लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, चुकांची पुनरावृत्ती केल्यास कठोर दंड ठोठावला जातो.