breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

६ डिसेंबर भारतीय क्रिकेटरसाठी खूपच खास, ‘या’ पाच क्रिकेटपटूंचा वाढदिवस

Cricketers Birthday Today : भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी आज एक प्रकारचा उत्सव असणार आहे. ६ डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघातील एकूण ५ क्रिकेटपटू आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आज श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, करुण नायर आणि माजी भारतीय क्रिकेटर आरपी सिंग यांचा वाढदिवस आहे. या पाच क्रिकेटपटूंचे वय आणि आंतरराष्ट्रीय विक्रमांबद्दल आपण जाणून घेऊयात..

जसप्रीत बुमराह :

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज ३० वर्षांचा झाला आहे. जानेवारी २०१६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बुमराहने आतापर्यंत एकूण ३० कसोटी, ८९ एकदिवसीय आणि ६२ टी-२० सामने खेळले आहेत. या काळात त्याने अनुक्रमे १२८, १४९ आणि ७४ बळी घेतले आहेत.

करुण नायर :

भारतीय फलंदाज करूण नायरचा आज ३१ वा वाढदिवस आहे. नायरने भारताकडून खेळताना २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात त्रिशतक केले होते. भारताकडून कसोटीत त्रिशतक करणारा तो विरेंद्र सेहवाग नंतरचा तो दुसराच खेळाडू आहे. त्याने आत्तापर्यंत ६ कसोटी सामने आणि २ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीमध्ये ३७४ धावा आणि वनडेत ४६ धावा केल्या आहेत.

हेही वाचा  –  ‘आम्ही ओबीसीतूच आरक्षण घेणार’; मनोज जरांगे पाटील यांची गर्जना 

आरपी सिंग :

या यादीत भारताच्या एका माजी वेगवान गोलंदाजाच्या नावाचाही समावेश आहे. आरपी सिंग आज ३८ वर्षांचे झाले आहेत. सप्टेंबर २००५ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण १४ कसोटी, ५८ एकदिवसीय सामने आणि १० टी-२० सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे ४०, ६९ आणि १५ विकेट घेतल्या. २००७ च्या टी-२० विश्वचषकात भारताला चॅम्पियन बनवण्यात आरपी सिंगने चेंडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली २१ वर्षांच्या कालावधीनंतर भारताने इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

रवींद्र जडेजा :

भारतीय क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज ३५ वर्षांचा झाला आहे. जडेजाचे पदार्पण फेब्रुवारी २००९ मध्ये झाले होते. आतापर्यंत, त्याने ६७ कसोटी, १९७ एकदिवसीय सामने आणि ६४ टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे २८०४ धावा आणि २७५ बळी, २७५६ धावा आणि २२० बळी, ४५७ धावा आणि ५१ बळी घेतले आहेत.

श्रेयस अय्यर :

भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर आज २९ वर्षांचा झाला आहे. आतापर्यंत या खेळाडूने १० कसोटी सामन्यात ४४.४० च्या सरासरीने ६६६ धावा, ५८ एकदिवसीय सामन्यात ४९.५९ च्या सरासरीने २३३१ धावा आणि ५१ टी-२० सामन्यात ३०.६६ च्या सरासरीने ११०४ धावा केल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी केली आणि चौथ्या क्रमांकावर खेळताना विश्वचषकात ५०० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button