breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#CoronaVirus : कोरोनामुळे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद अडकले जर्मनीत

मुंबई | भारतातील प्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद कोरोनामुळे जर्मनीत अडकले आहेत. कोरोनामुळे हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत, १६ मार्चला विश्वनाथन आनंद भारतात परतणार होते मात्र निर्बंधांमुळे आता त्यांना जर्मनीत राहणं भाग असणार आहे.

५० वर्षीय विश्वनाथन आनंद हे बुंडेसलीगा चेस लीगमध्ये सहभागी होण्यासाठी जर्मनीला गेले होते. मात्र निर्बंध असल्यामुळे त्यांना इथेच थांबणं बंधनकारक असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे त्यांनी स्वत:ला विलग केलं आहे. त्याचप्रमाणे तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे ते खबरदारीही घेत आहेत. ते १६ मार्चला केरळमध्ये परतणार होते, मात्र अनिश्चित काळासाठी ते तिथे अडकले आहेत, फोन आणि व्हिडिओ कॉल्सद्वारे ते आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. दरम्यान कोरोना विषाणूमुळे जगभरात ६००० हजार जणांचे मृत्यू झाले आहेत. चीन, इटली, इराण सारख्या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button