breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs WI : भारतीय कसोटी संघातून ‘या’ दिग्गज खेळाडूचा पत्ता कट

IND vs WI : चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिजविरुद्ध कॅरेबियनमध्ये होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. २०२३-२५ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताची पहिली नियुक्ती कोणती असेल यासाठी १६ जणांच्या संघात अनकॅप्ड रुतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. १२ जुलैपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. रोहित शर्मा कर्णधार तर अजिंक्य रहाणे उपकर्णधार असणार आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, पुजाराच्या संघातील स्थान हे निवडकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. या मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. या दौऱ्यात २ टेस्ट, ३ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळले जाणार आहेत. १२ जुलैपासून या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. १३ ऑगस्टपर्यंत हा दौरा असेल. दरम्यान, या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

हेही वाचा – आषाढी वारीसाठी भारतीय रेल्वे सज्ज; वारकऱ्यांसाठी धावणार ‘या’ विशेष गाड्या

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शार्दुल ठाकूर, आर जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button