क्रिडाताज्या घडामोडी

बांगलादेश क्रिकेट टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर

टी 20i मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर, ईशानला संधी

राष्ट्रीय : बांगलादेश क्रिकेट टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभयसंघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर आता 3 मॅचची वनडे सीरिज खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 8 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. सध्या 3 सामन्यांची ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका विजयाची समसमान संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. हा सामना 8 जुलैला होणार आहे.

त्यानंतर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 10 ते 16 जुलै दरम्यान टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेने या मालिकेसाठी 7 जुलै रोजी संघ जाहीर केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

बांगलादेश विरूद्धच्या या मालिकेत चरिथ असलंका हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघात माजी कर्णधार दासुन शनाका याचं जवळपास एका वर्षानंतर कमबॅक झालं आहे. दासुनने शेवटचा सामना हा जुलै 2024 मध्ये खेळला होता. तसेच चमिका करुणारत्ने याचंही कमबॅक झालं आहे.

हेही वाचा – राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश

भानुका राजपक्षे याला नो एन्ट्री
भानुका राजपक्षे याला निवड समितीने डच्चू दिला आहे. भानुका न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत काही खास करु शकला नव्हता. भानुकाने 2 सामन्यांमध्ये फक्त 14 धावाच केल्या होत्या.

ईशान मलिंगाची पहिल्यांदाच निवड
ईशान मलिंगाची टी 20i संघात पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ईशानला पदार्पणाची संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. ईशानने श्रीलंकेचं 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

लिटन कुमार दासकडे बांगलादेशंच नेतृत्व
तर दुसऱ्या बाजुला पाहुण्या बांगलादेशने श्रीलंकेआधीच या मालिकेसाठी संघ जाहीर केला. बांगलादेशने टी 20i मालिकेसाठी 16 खेळाडूंची निवड केली. लिटन कुमार दास हा बांगलादेशचं या मालिकेत नेृतत्व करणार आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, गुरुवार 10 जुलै, पल्लेकेले

दुसरा सामना, रविवार 13 जुलै, दांबुला

तिसरा सामना, बुधवार 16 जुलै, कोलंबो

बांगलादेश विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी श्रीलंका टीम : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कुसल परेरा, कामिंदु मेंडिस, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका, दुनिथ वेल्लागे, वानिंदु हसरंगा, महेश तीक्ष्णा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, बिनउरा फर्नांडो आणि ईशान मलिंगा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button