breaking-newsक्रिडा

#AUSvIND 2nd Test : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया 4 बाद 132

पर्थ – भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 132 धावांपर्यत मजल मारली आहे. याबरोबरच पहिल्या डावातील 43 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर एकूण 175 धावांची आघाडी घेतली आहे.

कालच्या 3 बाद 172 वरून पुढे खेळताना भारतीय संघाचा पहिला डाव 283 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा चौथा बळी हा अंजिक्य रहाणे ठरला. रहाणे तिसऱ्या दिवशी एकही धाव न काढता 51 वर बाद झाला. तर विराट कोहलीनं कालच्या नाबाद 82 धावांवरून पुढे खेळताना कसोटी क्रिकेटमधील आपले 25 वे शतक पूर्ण केले. विराट 123 धावांवर बाद झाला.

त्यानंतर ऋषभ पंत वगळता भारताचा एकही फलंदाज  मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. ऋषभ पंतने 50 चेंडूत 36 धावा केल्या. तर हनुमा विहारी 20, मोहम्मद शमी 0, इंशात शर्मा 1, उमेश यादव 4 आणि बुमराह 4 धावांवर बाद झाला.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ICC

@ICC

Another fascinating day of Test cricket! Australia close day three in Perth on 132/4 in their second innings, with a lead of 175 runs over India after the visitors were dismissed for 283. #AUSvIND scorecard ➡️ http://bit.ly/AusvInd5 

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाची सुरूवात केली असून तिसऱ्या दिवसअखेर 4 बाद 132 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिंच हा दुखापतीमुळे निवृत्त झाला आहे. त्याने 25 धावा केल्या. तर सलामीवीर मार्कस हॅरिस हा 20 धावा काढून बाद झाला. भारताकडून दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने 2 तर इशांत आणि बुमराहाने प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळपट्टीवर टिम पेन 8 आणि उस्मान खाव्जा 41 धावांवर खेळतो आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button