ऑस्ट्रेलिया संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश
![Australia's entry into the final of the World Test Championship](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Australia-World-Test-Championship-780x470.jpg)
तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर ९ गडी राखून विजय
INDvsAUS : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची कसोटी सिरीज सुरू आहे. पहिल्या दोन सामन्यांती विजयानंतर भारतीय संघाला तीसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. तिसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट राखून विजय मिळवला आहे.
अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी ७६ धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाची विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडने ४९ आणि लाबुशेन याने २८ धावांची नाबाद खेळी केली आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण चार कसोटी सामने खेळले जाणार आहेत. सीरीजमध्ये आता २-१ अशी स्थिती आहे. भारतीय संघ पराभूत झाला असला, तरी अजूनही आघाडीवर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताकडेच राहणार आहे. ऑस्ट्रेलियाकडे आता शेवटची कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे.
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश
तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर नऊ गडी राखून विजय मिळविल्याने त्यांना यंदाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान निश्चित करण्यात मदत झाली आहे, परंतु निर्णायक सामन्यात त्यांच्यासोबत कोण सामील होईल हे उघड आहे.
या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांच्या संभाव्य WTC गुणांपैकी 68.52 गुण मिळवण्यात मदत झाली आहे आणि याचा अर्थ ते भारताविरुद्धच्या त्यांच्या चालू असलेल्या मालिकेतील शेवटच्या कसोटीतील निकालाची पर्वा न करता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला वर्तमान कालावधी पूर्ण करतील.