AUS vs IND 4 test: टीम इंडियाला धक्का; ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही बुमराह
![AUS vs IND 4 test: Team India pushed; Bumrah will not play in the Brisbane Test](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/बुमराह.jpg)
ब्रिस्बेन कसोटी सामन्यााधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह 15 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराह शेवटच्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचा दावा बीसीसीआयच्या सुत्रांनी केला आहे.
वाचा :-#Covid-19: सायना नेहवाल व HS Prannoy यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
जसप्रीत बुमराह पोटाच्या समस्येने त्रस्त आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, दुसऱ्या डावात बुमराह मैदानातून बाहेर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. काही काळाने बुमराह मैदानात परत आला होता. त्यानंतर त्याने गोलंदाजीही केली होती.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थिती टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूला संधी मिळणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. याव्यतिरिक्त टी नटराजन किंवा कार्तिक त्यागी चौथ्या कसोटीत डेब्यू करण्याची शक्यता आहे.