breaking-newsक्रिडा

Asia Cup 2018 Live Ind vs Pak : कर्णधार सरफराज माघारी, केदार जाधवला मिळाला बळी

तब्बल १५ महिन्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानात समोरासमोर आले आहेत. दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासमोर विजयासाठी २८० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य ठेवून सामन्यात बाजी मारण्याचा पाकिस्तानच्या संघाचा मानस असणार आहे. मागच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या संघात कोणतेही बदल केलेले नाहीयेत.

दुसरीकडे भारताला आपला हाँग काँगविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली होती. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने दोन बदल केले असून जसप्रित बुमराह आणि हार्दिक पांड्याला संघात जागा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आजच्या हायव्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button