breaking-newsक्रिडा

Asia Cup 2018 : शोएब मलिकच्या संयमी खेळीमुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानवर मात

अनुभवी शोएब मलिकने अखेपर्यंत मैदानात तळ ठोकून केलेल्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर पाकिस्तानने Super 4 गटात अफगाणिस्तानवर ३ गडी राखून मात केली आहे. अफगाणिस्तानने दिलेलं २५८ धावांचं आव्हान पार करताना, पाकिस्तानच्या फलंदाजांचीही चांगलीच दैना उडाली होती. याच कारणासाठी या सामन्याचा निकाल अखेरच्या षटकापर्यंत खेचला गेला. अखेरच्या षटकात १० धावांची गरज असताना शोएब मलिकने, अफताब आलमच्या गोलंदाजीवर एक षटकार व एक चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मलिकने ४३ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी केली

पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमान उल हक या जोडीने १५४ धावांची भागीदारीही रचली. मात्र या जोडीला अपेक्षित धावगती न राखता आल्यामुळे पाकिस्तानसमोरचं आव्हान वाढलं. त्यातचं राशिद खानने पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडल्यामुळे ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या, मात्र मलिकने अखेरपर्यंत संघासाठी किल्ला लढवला. या खेळीसाठी सामनावीराच्या किताबाने मलिकचा गौरव करण्यात आला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तानच्या हशमतुल्ला शाहिदीचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. तो ९७ धावांवर बाद झाला. दुसरीकडे कर्णधार असगरने केलेल्या ६७ धावांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने २५७ धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या १० षटकात या जोडीने आपल्या संघासाठी ८७ धावा काढल्या. मात्र गोलंदाजीत अखेरच्या षटकात पाकिस्तानवर दबाव राखण्यात अपयशी ठरल्यामुळे अफगाणिस्तानला या सामन्यात हार पत्करावी लागली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button