किंग कोहलीचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
Virat Kohli : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ आज बांगलादेशचा सामना करत आहे. भारताने आधीच फायनलमध्ये प्रवेश निश्चित केल्यामुळे बांगलादेशविरुद्धची मॅच ही केवळ औपचारिकता राहिली आहे. दरम्यान, या सामन्यात विश्रांतीवर असलेल्या विराट कोहलीचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओ मध्ये विराट कोहली सहकाऱ्यांसाठी पाणी आणताना दिसला. ब्रेक दरम्यान खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याची जबाबदारी विराट कोहलीवर आली. त्याने आपल्या वेगळ्याच अंदाजात मैदानात धाव घेतली आणि खेळाडूंसाठी पाणी घेऊन आला. विराटचा मस्करीचा स्वभाव सुटला नाही आणि तो उड्या मारत मैदानावर पाणी घेऊन आल्याने सहकाऱ्यांनाही हसू आवरले नाही.
हेही वाचा – लोकनेते लक्ष्मणभाऊंनी समाजसेवेसह अध्यात्मिक धागाही जपला!
— RVCJ Media (@RVCJ_FB) September 15, 2023
विराट कोहलीच्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला जात असून विराट कोहलीचं कौतुक होत आहे.