वर्धापन दिनी दामिनी देशमुखांच्या नेतृत्वाखाली वायुसेना तुकडी पथसंचलन करणार
विमानातून पुष्पवृष्टी करून ध्वजारोहणाला मानवंदना
![Anniversaries, Damini Deshmukh, Leadership, Air Force, Detachment, Street Parade,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/deshmukha-780x470.jpg)
बीड : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या रविवारी (ता. २६) होणाऱ्या वर्धापन दिनी राजपथावर २२ लढाऊ विमाने, ११ वाहतूक विमाने, सात हेलिकॉप्टर आणि तटरक्षक दलाची तीन डॉर्नियर पाळत ठेवणारी विमाने अशा ४० विमानांद्वारे या वर्षी फ्लायपास्ट दोन टप्प्यांत होईल. याच वेळी एअरफोर्सच्या १४४ जवानांची तुकडी पथसंचलन करणार असून पथसंचलनाचे नेतृत्व करणाऱ्या चौघांच्या फळीत जिल्ह्यातील दामिनी देशमुख यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्णया हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यासाठी विमानातून पुष्पवृष्टी करण्याची धुराही एअरफोर्समधील फ्लाईंग लेफ्टनंट असलेल्या दामिनी देशमुख यांच्यावर आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब मानली जात आहे.
परेडच्या समारोपाच्या दुसऱ्या टप्प्यात राफेल, सुखोई, जग्वार सारख्या १२ लढाऊ विमानांचे फॉर्मेशन्स असेल. यावेळी इंडियन एरफोर्सच्या चार अधिकाऱ्यांसह १४४ एअरमनची तुकडी संचलन करेल. तुकडीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये कमांडर महेंद्रसिंग, फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख, फ्लाईट लेफ्टनंट नेपो माेईरंगथेम व फ्लाईंग ऑफीसर अभिनव घोषाल यांचा समावेश आहे.
जिल्ह्याची सुकन्या या तुकडीत असणे अभिमानास्पद मानले जात आहे. विशेष म्हणजे राज्यातून देखील दामिनी देशमुख एकमेव यात आहेत. दरम्यान, या संचलनाची मागच्या दोन महिन्यांपासून तयारी सुरु आहे. तयारीतील कामगिरीच्या जोरावर नेतृत्व करणाऱ्या चौघांमध्ये दामिनी देशमुख यांची निवड झाली.
अशी आहे दामिनीची वाटचाल
मुळची देवडी (ता. वडवणी) येथील रहिवाशी असलेल्या दामिनी देशमुख या पुणे येथील निवृत्त सह धर्मादाय आयुक्त दिलीपराव देशमुख यांची मुलगी आहे. १० वी बोर्ड परीक्षेत ९५.८२ टक्के तर बारावी विज्ञान परीक्षेत ८७.५० टक्के गुण मिळवूनही त्यांनी आवडत्या सैनिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारची इन्स्पायर ही चार लाख रुपयांची शिष्यवृत्तीही सोडली. सात वर्षे मुलींच्या सैनिक शाळेत शिक्षण घेत त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळविली.
हेही वाचा : महारेराकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी
देशपातळीवरील परीक्षेत दिड लाख उमेदवारांमधून निवड झालेल्या २५ मुलींमधून २०१९ मध्ये त्यांची फ्लाईंग ऑफीसर म्हणून निवड झाली. तत्पुर्वी सात वर्षे मुलींच्या सैनिक शाळेत शिक्षण घेत त्यांची २०१९ मध्ये फ्लाईंग ऑफीसर म्हणून निवड झाली. क्षता किंवा ले, देशभरातून तीन लाख उमेदवारांनी सहभाग घेतलेल्याइंडिगल (हैदराबाद) येथील एअर फोर्स अॅकॅडमी येथे त्यांनी लढाऊ विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला सिरसा (हरियाणा) येथे फ्लाईंग ऑफीसर म्हणून सेवेनंतर दामिनी देशमुख यांचे फ्लाईंग लेफ्टनंट (कानपूर, उत्तरप्रदेश) येथे पदोन्नती झाली.
देशपातळीवरील परेडच्या संचलनाचे नेतृत्व करण्याची दामिनीला संधी मिळणे हे आमच्यासह सर्व जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. चौघांमध्ये तिचा समावेश आहे. १४४ जवानांची तुकडी परेड करणार आहे.