रोहित शर्मापाठोपाठ स्टार खेळाडू विराट कोहलीला दुखापत
![After Rohit Sharma, star player Virat Kohli is injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/535579-virat-kohli-gets-injured-india-vs-england-semi-final-t20-world-cup-2022-nmp-780x470.webp)
वर्ल्ड कप 2022 सेमीफायनलमध्ये गुरुवारी 10 नोव्हेंबरला भारत विरुद्ध इंग्लंड सामना रंगणार आहे. पण सेमीफायनल खेळापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मापाठोपाठ स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli gets injured) दुखापत झाली आहे. सरावादरम्यान वेगवान बॉलर हर्षल पटेलच्या बॉल विराट यांच्या मांडीवर बसला.
पहिले रोहित आता विराट…
मंगळवारी सराव करत असताना कर्णधार रोहित शर्मालाही दुखापत झाली होती. मात्र, उपांत्य फेरीसाठी आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे त्याने आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. रोहित फिट असल्याचं कळताच भारतीय संघाला अजून एक धक्का बसला. सरावादरम्यानच हर्षल पटेलच्या बॉलने विराट कोहली दुखापतग्रस्त झाला आहे. ज्यावेळी विराटला बॉल लागला तेव्हा तो वेदने कळत होता आणि लगेचच खाली मैदानावर बसला.
Scary moment for Virat Kohli, Harshal Patel ball hit him in the nets. pic.twitter.com/iIUyit9XgL
— Aru★ (@Aru_Ro45) November 9, 2022
विराट उद्या खेळणार का?
दुखापत झाल्यानंतर काही वेळाने विराट स्वस्थ दिसला. थोड्या वेळानंतर तो चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसला. आता टी20 वर्ल्डकप बद्दल बोलायचं झालं तर विराट कोहली वर्ल्डकपच्या इतिहासात कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरोधात तुफान खेळी करुन त्याने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. जर बुधवारी पाकिस्तान सेमीफायनल जिंकते आणि गुरुवारी भारत विजयी झाला. तर टी 20 वर्ल्डकपचा थरार हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान रंगणार.