breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

Neeraj Chopra : गोड्लन बॉय नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी!

Neeraj Chopra : जागतिक भालफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. त्याने ८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक केली. तर पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नीरजने आज पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला.

नीरज चोप्रानं नदीमला मागे टाकताना तब्बल ८८.१७ मीटरच्या टप्प्यावर भालाफेक केली. खरंतर नीरजच्या सर्वोत्तम पाच कामगिरींपेक्षाही हा टप्पा कमी असला, तरी त्याला इतिहास घडवण्यासाठी आणि भारताच्या नावावर पहिलं सुवर्णपदक करण्यासाठी ही कामगिरी पुरेशी ठरली. याआधी ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजनं सुवर्णपदक पटकावलं आहे.

हेही वाचा – मुंबईतून बेपत्ता, लिबियाने पाकिस्तानी प्रियकराशी केले लग्न, 1 वर्षानंतर का परतली महाराष्ट्राची ‘सीमा हैदर’?

नीरजबरोबरच पाचव्या स्थानी भारताकडून किशोर जेना (८४.७७ मीटर) आणि सहाव्या स्थानी डी. पी. मनू (८४.१४ मीटर) यांच्या कामगिरीनं भालाफेक प्रकारात भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button