Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार! १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला मिळणार टीम इंडियापेक्षा ‘वेगळी’ ड्रेसिंग रूम

Vaibhav Sooryavanshi Separate Dressing Room England Tour : भारत आणि आयर्लंड यांच्यात २६ जूनपासून दोन सामन्यांची, तर १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. या संपूर्ण दौऱ्यात सर्वात जास्त चर्चा आहे ती भारताचा १५ वर्षांचा युवा डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल अशी दाट शक्यता आहे. मात्र, या ऐतिहासिक पदार्पणापूर्वीच एक अत्यंत अजब आणि मोठी माहिती समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत मुख्य ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलता येणार नाहीत, त्याच्यासाठी पूर्णपणे वेगळी चेंजिंग रूम दिली जाणार आहे.

आयसीसीचा ‘सेफगार्डिंग प्रोसिजर’ नियम काय आहे?

‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, वैभव सूर्यवंशी हा अवघ्या १५ वर्षांचा असल्याने इंग्लंडमध्ये त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ‘सेफगार्डिंग प्रोसिजर’ नियम लागू केला जाईल. या कडक नियमानुसार, १६ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन खेळाडूला प्रौढ (बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या मोठे) खेळाडूंसाठी बनवलेल्या मुख्य चेंजिंग रूमचा वापर करण्याची परवानगी नसते.

हेही वाचा –  गोड पदार्थांचे सेवन कधी करावेत? जेवणाआधी की जेवणानंतर, जाणून घ्या आयुर्वेद तज्ञांकडून

याच नियमामुळे इंग्लंडमधील सर्व स्टेडियमध्ये वैभवसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र आणि वेगळी व्यवस्था केली जाईल. मात्र, सामना सुरू असताना रणनीती आखण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी तो मैदानावर इतर सहकाऱ्यांसोबतच असेल. अद्याप आयर्लंड क्रिकेट बोर्ड हाच नियम लागू करणार की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

हॉटेलमध्ये आई-वडीलही राहणार सोबत –

वैभव हा अजून लहान असल्याने बीसीसीआयने विशेष काळजी घेतली आहे. प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन बीसीसीआयने वैभवच्या आई-वडिलांनाही या दौऱ्यावर अधिकृतपणे सोबत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी असेल, त्याच हॉटेलमध्ये वैभवचे आई-वडीलही त्याच्यासोबत राहतील. कॅप्टन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २६ आणि २८ जूनला आयर्लंडशी भिडणार असून त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button