IPL पूर्वी बुमराहसह ७ खेळाडू दुखापतग्रस्त
![7 players injured before IPL including Bumrah](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/IPL-2023-780x470.jpg)
IPL 2023 : आयपीलच्या सोळाव्या हंगमाला उद्यापासून म्हणजेच ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. आगामी हंगामात पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. त्याआधीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेक खेळाडू दुखापतीने ग्रस्त आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींचा टेन्शन वाढले आहे.
या दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्सचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह, दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, पंजाब किंग्जचा सलामवीर जॉनी बेअरस्टो, चेन्नई सुपर किंग्जचा काइल जेम्सन, आरसीबीचा विल जॅक्स, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि राजस्थान रॉयल्सचा प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू यंदा आयपीएलमधून बाहेर असणार आहेत.
तसेच जोश हेझलवूड, रजत पाटीदार, मोहसीन खान, लोकी फर्ग्युसन, मुकेश चौधरी यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश असून त्यांच्या सहभागाबद्दल देखील साशंकता आहे.