breaking-newsक्रिडा

स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018: पीडीसीए क्‍लबची विजयी आगेकूच सुरुच

पुणे- निलेश नेवस्करची अष्टपैलू कामगिरी आणि अनिश पलेशाच्या अर्धशतकी खेळीच्या बलावर पीडीसीए संघाने पीवायसीच्या संघाचा 5 गडी राखून पराभव करताना येथे सुरु असलेल्या स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पीवायसीच्या संघाने निर्धारीत 45 षटकांत आठ बाद 214 धावांची मजल मारताना पीडीसीएच्या संघासमोर विजयासाठी 215 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना पीडीसीएने हे आव्हान 44.4 षटकांत 5 बाद 215 धावा करताना सामना 5 गडी राखून जिंकला.

यावेळी 215 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पीडीसीएच्या सलामीवीरांनी चांगले सुरुवात करुन दिली. यावेळी अनिश पलेशायाने 50 धावांची खेळी केली. तर, एस. महाजनने 28 धावांची खेळी करत त्याला सुरेख साथ दिली. हे दोघेही परतल्यानंतर निलय नेवसकरने संघाचा डाव सावरला. यावेळी दुसऱ्याबाजुने खेलणारे ऋषभ पारिख 4 आणि वरद खानविलकर शुन्यावरच बाद झाल्यानंतर निलयने अक्षय चव्हानला साथीत घेत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. यावेळी निलयने 60 धावा केल्या. निलय बाद झाल्यानंतर अक्षयने संघाच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अक्षयने नाबाद 49 धावांची खेळी केली तर दिपक डांगीने 9 धावा करत त्याला साथ दिली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पीवायसीच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर अमेय भावे केवळ दोन धावा करुन बाद झाला. तर, अमेय बाद झाल्यानंतर श्रेयाज वाळेकर आणि आदर्श बोथ्रायांनी संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. यावेळी श्रेयाजने 32 धावांची खेळी केली. तर, आदर्शने 86 धावांची खेळी करत संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. हे दोघेही बाद झाल्यानंतर पीवायसीचा संघ चांगलाच अडचणेत सापदला होता. मात्र, गवाळे पाटिलने अखेरच्या षटकांमध्ये 37 धावांची खेळी करत पीवायसीच्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button