breaking-newsक्रिडा

स्टार्स क्रिकेट ट्रॉफी 2018 : व्हेरॉक संघाला विजेतेपदाचा मान

पुणे – यश जगदाळे आणि आदर्श एकशिंगेयांच्या धडाकेबाज फलंदाजी नंतर मानव बारीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ऍकॅडमीने आर्यन्स क्रिकेट क्‍लबचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या स्टार्स क्रिकेट ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.

व्हेरॉक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 45 षटकांत 6 गडी गमावून 290 धावांची मजल मारताना आर्यन्स क्रिकेट क्‍लब समोर विजयासाठी 291 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना आर्यन्स क्रिकेट क्‍लबला 44.3 षटकांत सर्वबाद 174 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 116 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

यावेळी, प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या आर्यन्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर दिग्विजय जाधव आणि जयेश पोळ यांना विशेष चमक दाखवता आली नाही. दिग्विजयने 2 तर जयेशने 6 धावा केल्या. खराब सुरुवातीनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या यश बांबोळी आणि प्रथमेश पाटीलयांनी संघाचा डाव सावरण्याचा काहीसा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. यावेळी यशने 21 धावा केल्या.

तर, प्रथमेशने 12 धावांची खेळी केली. तर त्यानंतर आलेल्या रोहित हडके आणि पुरंजय राठोडला देखिल अपयश आले. त्यानंतर आलेल्या प्रशम गांधी आणि इन्द्रजीत खुटवाडयांनी थोडाफार प्रतिकार करत चांगल्या खेली केल्या. मात्र, त्यांना इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. त्यामुळे त्यांना 116 धावांनी पराभूत व्हावे लागले. यावेळी व्हेरॉकच्या मनन बारीने 41 धावांमध्ये तीन गडी बाद केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या व्हेरॉकच्या संघाचे सलामीवीर अद्वैत मुळे आणि यद्नेश मोरेयांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यावेळी अद्वैतने 21 धावांची खेळी केली. तर, मोरेयाने 22 धावा करत त्याला साथ दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर आलेल्या किरन मोरेला एकही धाव करता आली नाही. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर लागोपाठ 3 झटके मिळाल्यावर व्हेरॉकच्या मधल्याफळीतील फलंदाज यश जगदाळे आणि आदित्य एकशिंगेयांनी सावध फलंदाजी करताना संघाचा डाव सावरला.

यावेळी यशने 89 चेंडूत 86 धावांची खेळी केली. तर, आदित्यने 90 चेंडूत 64 धावा करत त्याला सुरेख साथ दिली. हे दोघेही बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये मनन बारी आणि राहुल वारेयांनी फटकेबाजी करताना संघाला 290 धावांची मजल मारुन दिली. यावेळी मननने 22 चेंडूत 41 धावांची तर राहुल वारेने 18 चेंडूंमध्ये नाबाद 26 धावांची खेळी केली. यावेळी आर्यन्स संघाकडून रेहान खानयांनी 49 धावांत 3 गडी बाद केले तर दिग्विजय जाधवने 44 धावांत 2 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. यावेळी सामन्यात 41 धावा आणि 3 गडी बाद केल्याबद्दल मनन बारीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक – व्हेरॉक क्रिकेट ऍकॅडमी 45 षटकांत 6 बाद 290 (यश जगदाळे 86, आदित्य एकशिंगे 64, रेहान खान 49-3, दिग्विजय जाधव 44-2), विजयी विरुद्ध आर्यन्स क्रिकेट क्‍लब 44.3 षटकांत सर्वबाद 174 (इंद्रजीत खुटवाड 43, प्रशम गांधी 26,मनन बारी 41-3).

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button