सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया ,कोरोना चाचणीही निगेटीव्ह
![I don't know if former cricketer Sourav Ganguly will join BJP - Dilip Ghosh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/saurav-ganguly-Admitted-to-hospital-due-to-mild-heart-attack.jpg)
कोलकाता – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती स्थिर असून कोरोना चाचणीही निगेटीव्ह आली आहे.
शनिवारी जीममध्ये व्यायाम करताना सौरव गांगुलीला सौम्य हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला दक्षिण कोलकाता येथील वुडलँड या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. २००३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नॅटवेस्ट सीरिजमध्ये भारताने धोबीपछाड दिला होता. त्या विजयानंतर लॉर्ड्सच्या गॅलरीत गांगुलीने टी-शर्ट काढून फिरवलेला तो प्रसंग साऱ्यांच्या आजही लक्षात आहे. BCCI अध्यक्ष झाल्यानंतरही गांगुलीने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत. करोना संकटातही IPL2020चे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा होता.