सौरव गांगुलीचे मोठे भाऊ स्नेहाशीष गांगुली यांना कोरोनाची लागण
![Ranji Trophy cricket tournament starts from February 13; Information about Sourav Ganguly](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Sourav-Ganguly-.jpg)
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीच्या कुटुंबापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) सचिव स्नेहाशीष गांगुली यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
स्नेहाशीष यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्याआधी स्नेहाशीष यांच्या सासू-सासऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या चौघांनाही कोव्हिड 19 ची लक्षणे होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. यंदा आयपीएलचे सामने खेळवले जाणार की नाही याबाबत बराच खल सुरु होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलचे सामने भरलेच नाहीत. कोरोना संकट टळल्यानंतर पुन्हा क्रिकेट सामने सुरु होतील, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.