सामन्यासाठी जाताना चार भारतीय हॉकीपटूंचा अपघाती मृत्यू
भारताचे राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय ४ हॉकीपटू यांचा मध्य प्रदेशच्या होशंगाबादजवळ अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सामना खेळायला जाताना त्यांच्या कारला अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग ६९ वर ही दुर्दैवी घटना घडली. सामन्यासाठी जात असताना खेळाडूंची कार थेट झाडाला जाऊन धडकली आणि त्यात चौघांचा मृत्यू झाला तर तिघांना गंभीर दुखापत झाली. दुखापतग्रस्त खेळाडूंना जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
Madhya Pradesh: Four national level hockey players dead, three injured, in a car accident in Hoshangabad
२२५९:०७ म.पू. – १४ ऑक्टो, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता१५१ लोक याविषयी बोलत आहेत
होशांगबादमध्ये सध्या मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेसाठी जाताना हा प्रकार घडला स्विफ्ट कारमधून हे खेळाडू सामन्यासाठी जात होते. त्यावेळी चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट झाडावर जाऊन आदळली. शहनवाझ खान (इंदोर), आदर्श (इटारसी), आशिष लाल (जबलपूर) आणि अनिकेत (ग्वाल्हेर) या चार राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर इतर तीन ते चार जण गंभीर जखमी आहेत. गंभीर असलेल्या हॉकीपटूंपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती आहे.