breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020 : सलामीच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव

अबु धाबी – कोरोना व्हायरसविरुद्ध संपूर्ण जग लढत आहे. अशा महासंकट काळात क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद देणारी आयपीएल स्पर्धा कालपासून सुरू झाली. या स्पर्धेची सुरुवात महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने दमदार विजयाने केली. सलामीच्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा 5 विकेटने पराभव केला.

चेन्नईने 163 विजयी धावांचं आव्हान 5 विकेट गमावून पूर्ण केलं. चेन्नईने 19.2 ओव्हरमध्ये 166 धावा केल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 71 धावा केल्या. त्या पाठोपाठ फॅफ डु प्लेसिसने नाबाद 58 धावा केल्या. मुंबईने विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या दोन ओव्हरमध्येच शेन वॉटसन आणि मुरली विजय बाद झाल्याने चेन्नईला दोन मोठे झटके बसले. चेन्नईची 6 बाद 2 अशी परिस्थिती झाली होती. मात्र यानंतर अंबाती रायुडू आणि फॅफ डु प्लेसिसने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची शतकी भागीदारी केली. या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीने चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिन्सनने आणि इतर गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तर मुंबईची दमदार सुरुवात झाली होती. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि क्विटंन डी कॉक यांच्यात 46 धावांची भागीदारी झाली. मात्र यानंतर मुंबईने ठराविक अंतराने विकेट गमावले. मुंबईकडून सर्वाधिक सौरभ तिवारीने 42 धावा केल्या. तर चेन्नईकडून लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि दीपक चाहर या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button