संजय मांजरेकर यांना BCCI च्या समालोचकांच्या पॅनलमधून घ्यायला सांगितली EXIT
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना समालोचकांच्या पॅनलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलं आहे. मांजरेकर गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयच्या समालोचन पॅनलचे नियमित सदस्य आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आयपीएलमध्येही ते सहभागी होण्याची शक्यता कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कोरोना विषाणूमुळे यंदा आयपीएलची सुरुवात २९ मार्चऐवजी आता १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे.’मुंबई मिरर’ ने दिलेल्या वृत्तानुसार, मांजरेकर हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेसाठी धर्मशाळा येथे गेले नव्हते. पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. या सामन्यात मांजरेकर यांचे सहकारी समालोचक सुनील गावसकर, मुरली कार्तिक आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन उपस्थित होते.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना समालोचकांच्या पॅनलमधून बाहेर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मांजरेकर गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयच्या समालोचन पॅनलचे नियमित सदस्य आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर आयपीएलमध्येही ते सहभागी होण्याची शक्यता कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे यंदा आयपीएलची सुरुवात २९ मार्चऐवजी आता १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे.
‘मुंबई मिरर’ ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यामुळेच मांजरेकर हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेसाठी धर्मशाळा येथे गेले नव्हते. पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. या सामन्यात मांजरेकर यांचे सहकारी समालोचक सुनील गावसकर, मुरली कार्तिक आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन उपस्थित होते.
संजय मांजरेकर यांनी आयसीसी विश्वचषक २०१९ दरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी मांजरेकर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यांनी हा वाद स्वत: ओढून घेतल्यानं मांजरेकर यांना पॅनलमधून बाहेर काढण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.