Breaking-newsक्रिडा
विराट-रोहितच्या शर्यतीत पुन्हा एकदा विराटनिच मारली बाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/virat-kohli-ground-Frame-copy.jpg)
कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात विंडीजवर मात केली. विराट कोहलीने, विंडीजने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ९४ धावा केल्या. त्याच्या या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकारांचा विक्रमाचा समावेश होता.
या अर्धशतकी खेळीदरम्यान विराट कोहलीने रोहित शर्माला पुन्हा एकदा मागे टाकलेल आहे.आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर पोहचला आहे.