breaking-newsक्रिडा
विराटच्या आक्रमक खेळीवर कर्णधार पोलार्डची प्रतिक्रीया, म्हणाला…
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ गडी राखून मात केलेली. विंडीजने विजयासाठी दिलेलं २०८ धावांचं आव्हान भारतीय संघाने विराट कोहलीच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर पूर्ण केलं. विराट कोहलीने ५० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने ९४ धावा केल्या आहेत.
विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड विराटच्या या खेळावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. “विराट कोहली हे एक वेगळ्याच प्रकारचं रसायन आहे. तो दिग्गज फलंदाज आहे. प्रत्येकवेळी त्याने आपल्या खेळीमधून हे सिद्ध करुन दाखवलेलं आहे. मैदानात त्याने जे काही केलं हे नेमकं काय होतं मलाही सांगता येणार नाहीत, पण हा देखील खेळाचाच एक भाग आहे.” पोलार्ड विराट कोहली आणि केजरिक विल्यम्समध्ये मैदानात रंगलेल्या द्वंद्वाविषयी बोलत होता.