Breaking-newsक्रिडा
विजेतेपदासाठी भारतासमोर आज बांगलादेशचे आव्हान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Football29-.jpg)
‘सॅफ’ चषक फुटबॉल स्पर्धा
: उपांत्य फेरीत मालदीवचा ०-४ असा पाडाव केल्यानंतर आता रविवारी काठमांडू येथील हलचौक स्टेडियमवर रंगणाऱ्या ‘सॅफ’ चषक १८ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील साखळी सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. मग उपांत्य फेरीत बांगलादेशने भूतानला हरवल्यामुळे दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे.
सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.